मातोरी येथे त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन

गुरुवर्य महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे आज किर्तन

0

तिंतरवणी, रयतसाक्षी ( गोरक्ष खेडकर ) : श्री पांडूरंग रुख्मीनी मुर्तिचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त मातोरी येथे दि. १७ शुक्रवार ते१९ रविवार या रोजी त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर कासार तालुक्यातील मातोरी येथे वेदमुर्ती ह.भ.प. महेश महाराज जोशी यांनी मंदिराची स्वतः उभारणी केली असून तेथे श्री पांडूरंग रुख्मीनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना निमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेे.

दि.१७ शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता श्री पांडूरंग रुख्मिनी मुर्तीची शोभा यात्रा होईल व सायंकाळी ८ वाजता गुरुवर्य महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी भगवानगडकर यांचे किर्तन होईल

त्यानंतर दि. १८ शनिवार रोजी सायंकाळी ५ ते ६ यावेळेत गुरुवर्य प्रेममुर्ती महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांचे आर्शिवादपर प्रवचन होईल व रात्री ९ ते ११ या वेळेत भालकेश्वर संस्थान चे महंत स्वामी शंकर महाराज यांचे किर्तन होईल दि.१९ रविवार रोजी सकाळी १० वाजता सर्व उपस्थित संत महंताच्या उपस्थिती मध्ये श्री. पांडूरंग रुख्मिनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल नंतर १२ ते २ यावेळेत मत्सेंद्रगड संस्थानचे महंत गुरुवर्य स्वामी जनार्दन महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व

त्या

महाप्रसादाचे वाटप होईल या कार्यक्रमास महाराष्ट्रातील सर्व संत महंत उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ३दिवस सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडतिल त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी सप्ताहाचा आनंद घ्यावा असे आवाहन वेदमुर्ती हभप महेश महाराज जोशी यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.