लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे स्मशानभूमीत सिमेंट बेंच

लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे कै. केरबा माधवराव गंजेवार व कै. चंद्रभागा केरबा गंजेवार यांच्या स्मरणार्थ हिंदू स्मशानभूमीत दहा सिमेंटचे बेंच लायन्स अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

0

नांदेड, रयतसाक्षी गोवर्धन घाट नांदेड येथील स्मशानभूमीत 5 सिमेंट चे बेंच आणि राम घाट जुना मोंढा येथील स्मशानभूमीत 5 सिमेंटचे बेंच देण्यात आले. यावेळी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा, कोषाध्यक्ष सुरेश निलावार, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार नरसिंह ठाकुर, अरविंद रामटेके हे उपस्थित होते.

यावेळी दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, गोवर्धन घाट व राम घाट येथे नांदेड शहरातील सर्वात जास्त अंत्यविधी होत असतात.स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या मयतांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने चंद्रकांत गंजेवार यांनी आपल्या आई-वडिलां च्या स्मृतीप्रित्यर्थ बेंच देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे.

यावेळी राम घाट येथे अंत्यसंस्कारासाठी कोणतीही भीती न बाळगता काम करणारी महिला कर्मचारी रजिंदरकौर मल्लीसिंग यांचा लायन्स क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राम घाट येथे गंगाभूषण कांकर ,धर्मा अरमुरे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.