नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्याचे सहधर्मदाय आयुक्तांचे कार्यालय लवकरच नांदेडमध्ये

सहधर्मदाय आयुक्तांचे कामकाज महिन्यातील दोन आठवडे नांदेडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

0

नांदेड, रयतसाक्षी: (चंद्रकांत गव्हाणे)-नांदेडमध्ये सहधर्मदाय आयुक्तांचे कार्यालय सुरु करण्याचे काम प्रस्तावित आहे. परंतु मराठवाड्याचा विस्तार लक्षात घेता या कार्यालयाचे कामकाज अधिक सुलभ व लोकोपयोगी व्हावे यासाठी औरंगाबाद येथील सहधर्मदाय आयुक्तांचे कामकाज महिन्यातील दोन आठवडे नांदेडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे या कार्यालयाचे कामकाज आता नांदेडमधून होणार आहे.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे सहधर्मदाय आयुक्त यांचे कार्यालय नांदेडमध्ये सुरु करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत राज्याचे सहाय्यक सॉलीटरी उपसचिव मनिषा कदम यांनी शुक्रवारी (दि १६ ) डिसेंबर रोजी विधी व न्याय विभागामार्फत एक जीआर काढला असून त्यामध्ये पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या मागणीचा स्पष्ट उल्लेख करत नांदेड,परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांसाठी धर्मदाय सहआयुक्तांचे स्वतंत्र कार्यालय सुरु होईपर्यंत

या तिन्ही जिल्हयातील प्रलंबित प्रकरणाची संख्या लक्षात घेता उपरोक्त तीन जिल्ह्यासाठी जनहिताच्या दृष्टीने सहआयुक्त औरंगाबाद यांना नांदेड येथे विशेष मोहीम म्हणून महिन्यातील दोन आठवडे कामकाज करण्याचे आदेशित केले आहे. महिन्यातील दोन आठवडे कोणती असावित या संदर्भातील आठवडे ठरवण्याचा अधिकार धर्मदाय आयुक्त यांना असेल असेही जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नांदेड येथे सह धर्मदाय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यासंदर्भातील हे पुढचे पाऊल असून यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील प्रकरणाचा लवकर निपटारा होणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विकासात्मक भूमिकेमुळे नांदेडमध्ये लवकरच आणखी एका कार्यालयाची भर पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.