धर्माबादेत गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुसे जप्त

घातपाताच्या तयारीतील तीन आरोपी ताब्यात

0

धर्माबाद,रयतसाक्षी: तालुक्यात गावठी पिस्तुलसह दोन जिवंत काडतूस व एक मोठी धारदार तलवार आढळुन आल्याप्रकरणी धर्माबाद पोलिसांनी तीन आरोपीना शुक्रवारी(दि.१६) नोव्हेंबंर रोजी अटक करण्यात आली आहे.

धर्माबाद पोलिसांनी मोठ्या शितापतीने तपास लावल्याने पुढे घडणा-या घातपाताचा डाव उधळुन लावल्याने धर्माबाद शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे. या प्रकरणी पिस्तुल मधील दोन आरोपी व तलवार मधील एक असा तीन आरोपीवर धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

धर्माबाद तालुक्यातील योगेश लोकडोबा गट्टूवार वय २३ (रा.पाटोदा बु.) मारुती शंकर कोंडलवाडे वय २७ (रा. मंगनाळी) या तरुणांच्या घरी गावठी पिस्तु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व अक्षय रावसाहेब वाघमारे वय २०( रा. पाटोदा खुर्द) यांच्याकडे मोठी धारदार तलवार असल्याची गोपनीय माहिती धर्माबाद पोलिसांना मिळाली.

यावरून धर्माबाबत नगरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली साहयक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस नाईक हरीश मांजरमकर, गोपनीय शाखेचे संतोष आनेराय, पोलीस नाईक, सुभाष मुंगल, संतोष घोसले, सचिन गडपवार, पंडित जोंधळे, व आबेदली यांनी सदरील तीनही तरुणांना सापळा रचून त्यांच्या गावात पकडून उपरोक्त शस्त्र विहिरीतून हस्तगत केले.

धर्माबाद पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुसार उपरोक्त कारवाई झाली असून अक्षय रावसाहेब वाघमारे राहणार पाटोदा खुर्द याच्याकडे मोठी धारदार तलवार आढळून आली त्यानुसार गु.र.नं. 284 कलम ४/२५भा. द. वी.प्रमाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गावठी पिस्तूल व दोन जिवंत राऊंड आढळून आले या प्रकरणी पाटोदा येथील योगेश लोकडोबा गट्टूवार व मंगनाळी येथील मारुती शंकर कोंडलवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हे वृत्त लिहीपर्यंत चालू होती.
उपरोक्त पार्श्वभूमीवर धर्माबाद तालुक्यात काही घातपाताचा प्रकार आहे का याचा पोलिस शोध घेत असून तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.