लाच घेणाऱ्या महिला पीएसाय ला कृष्णप्रकाशांचा दणका

बलात्काराचा गुन्हा न नोंदविण्याचे प्रकरण; २४ तासांच्या आत दबंग कारवाई

0

 

पिंपरी , रयतसाक्षी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या
सांगवी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक हेमा सिद्धराम सोळूंके (वय २८) यांना सत्तर हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (दि.२ डिसेंबर) पकडण्यात आले.तर, त्यांच्यावतीने ही लाच घेणारा याच पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक (जमादार) अशोक देसाई हा, मात्र एसीबी च्या पथकाला धक्का मारत चकमा देऊन लाचेच्या रक्कमेसह दुचाकीवरून पळून गेला होता.

या दोघांनाही 24 तासाच्या आत दबंग पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शु्क्रवारी (दि. 3 डिसेंबर) तडकाफडकी निलंबित केले.

गुन्हे तपासाची चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस पथकाला व सबंधित पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या जाहीर सन्मानासह वीस, पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रमाणपत्र देण्याचा चांगला पायंडा त्यांनी पाडलेला आहे.

त्याचबरोबर कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना ते बडगाही दाखवितात. यापूर्वीही त्यांनी चाकण, सांगवी, हिंजवडी व इतर पोलिस ठाण्यातील अशा पोलिस व अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केलेली आहे. कर्तव्यात कसूर आणि भ्रष्ठ अधिकारी , कर्मचार्यांवर कारवाईचे सातत्य ठेवत पोलिस दलास नेमका संदेश दिला आहे .

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून सत्तर हजार रुपये सोळूंके व देसाई या दोघांनी घेतले होते. सांगवी पोलिस ठाण्यातच यापूर्वीच्या लाचखोरीत कृष्णप्रकाश यांनी सबंधित लाचखोराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. त्या

अनुषंगाने या प्रकरणातही अशीच कारवाईची शक्याता वर्तविण्यात येत होती. झालेह ही असेच अवघ्या २४ तासांच्या आत शुक्रवारी (दि. ३) दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान एका ४२ वर्षीय पुरुष तक्रारदाराविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात दोन तक्रार अर्ज करण्यात आले होते. त्याची चौकशी महिला फौजदार सोळूंके यांच्याकडे देण्यात आली होती.

त्यात तक्रारदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटकडे तक्रार केली. तिची पडताळणी केल्यानंतर लावलेल्या सापळ्यात देसाईने लाच घेतली. मात्र, नंतर तो पळाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.