तीर्थक्षेत्र त्रिकूट चा विकास लोकसहभागातून होणार, आज मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन

रविवारी मशाल ज्योत व मॅरेथॉन स्पर्धेचे सकाळी आयोजन करण्यात आले आहे .

0

नांदेड, रयतसाक्षी (चंद्रकांत गव्हाणे) : आजादी का अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या वतीने नांदेड तालुक्यातील मौजे तीर्थपुरी येथील देवस्थानाचा तीर्थक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली आहे.

या तीर्थक्षेत्र चा विकास लोक सहभाग अभियानातून गोदावरी नदी व आसना नदी चा संगम असलेल्या त्रिकूट तीर्थक्षेत्र परिसराचा विकास होणार त्यासाठी जिल्हा प्रशासन यांनी गेल्या दोन दिवसापासून विविध कार्यक्रमांतर्गत श्रमदानातून नदीच्या पात्राची स्वच्छता रस्त्यांची निर्मिती करण्यात आली यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीमती.देवकुळे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री केंद्रे तहसीलदार मुगाजी काकडे नायब तहसीलदार डी पी मुळे संजीवनी मुखडे ग्रामसेवक गुरमे मोरे गट विकास अधिकारी नारवा ठक्कर आदींचा सहभाग होता.

शुक्रवार 16 डिसेंबर पासून दिनांक 23 डिसेंबर पर्यंत या कालावधीत लोकसहभागातून या परिसराचा विकास करण्यात विकास करण्यात येणार आहे . कार्यक्रमाचा भाग म्हणून सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री केंद्रे, कार्यकारी अभियंता भोजराज काकडे, मंडळ अधिकारी नायब तहसीलदार डीपी मरळे, संजीवनी मुपडे, ग्रामसेवक गुरमे ,तलाठी मोरे, गटविकास अधिकारी नारवटकर, सरपंच नागोराव वडजे, तीर्थक्षेत्र पुजारी कोंडीबा सोनटक्के ,माधव राऊत, माता साहिब गुरुद्वारा गुलाबसिंघजी , श्रीराम पाटील वडजे ,शंकर थोरात ,आदीसह ब्राह्मणवाडा व त्रिकुट परिसरातील नागरिक उपस्थित होते .

स्वयंसहायता बचत गटाचे महिला सेवाभावी संस्थेचे इरवंत सूर्य कार,यांनी परिश्रम घेऊन लोकसहभागातून त्रिकूट कमानी पासून ते तीर्थक्षेत्र पर्यंत या रस्त्याचे काम करण्यात आले . रविवारी मशाल ज्योत व मॅरेथॉन स्पर्धेचे सकाळी आयोजन करण्यात आले आहे .

यासाठी या परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा अशीही आव्हान उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री केंद्रे यांनी केले आहे या तीर्थक्षेत्र चा विकास होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून यासाठी जिल्हा परिषद सदस्य व लोकप्रतिनिधी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून या परिसराचा विकास करून घ्यावा असेही आव्हान शेवटी केंद्रे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.