अनिल परब गद्दार! उद्धवजी लक्ष द्या’ -रामदास कदम

राष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेना संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देखील लिहले असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.

0

रयतसाक्षी: शिवसेनेचे आमदार तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवेसेनेवरच हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र देखील लिहले असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.

पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घातला आहे.’ अशी टीका रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केली.

कदमांचे परबांवर टीकास्त्र
‘अनिल परबांनी रत्नागिरी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ते जिल्ह्यात येतात. पण आता आम्हाला संपवण्यासाठी अनिल परब तीन-तीन दिवस जिल्ह्यात येऊन ठाण मांडत आहेत.’ ‘उद्धवजींना तुम्ही मदत करत असाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही दुसऱ्या नेत्याला संपवा असा होत नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले होते. पण तसे झाले नाही. म्हणून सुडाची भावना ठेवत अनिल परब आता माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे.’ अशी गंभीर टीका रामदास यांनी केली आहे. पुढे रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परबांच्या प्रॉपर्टीबद्दल बोललो म्हणजे मी पक्षाबद्दल बोललो असे होत नाही. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता.’ असे देखील रामदास कदम म्हणाले.

गद्दार कोण?

‘गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम? मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करतात आणि आमच्या मुलाच्या जीवावर उठतात. दापोली आणि मंडणगड येथे योगेश कदम स्थानिक आमदार आहेत. परंतु अनिल परबांनी स्थानिक जिल्हाप्रमुखांना हाताशी घेऊन थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अनिल परब हा शिवसेनेच्या मुळावर उठलेला आहे. निष्ठावंतांची हकालपट्टी करत बाटग्यांना अनिल परबांनी तिकिटे दिली. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख होते’ असे म्हणत रामदास कदमांनी अनिल परबांचा मोठा पाढाच वाचला.

सुभाष देसाईंना मंत्रिपद दिले याचे मला वाईट वाटले’

‘एक गोपनीय गोष्ट होती ती तुम्हाला सांगतो. शिवसेना भवनात मी स्वत: उद्धव ठाकरेंना सांगितले होते. साहेब, रामदास कदम, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आमचे आता 70 च्या आसपास वय झाले आहे. आम्हाला मंत्रिपदे देऊ नका. तुम्ही नवीन लोकांना मंत्रिपदे द्या. मला साहेब म्हणाले नक्की? मी म्हटले हो साहेब नक्की.. माझी तयारी आहे.

पण ज्यावेळेस मंत्रिपदाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईचे होते. मला वाईट वाटले तेव्हा. माझे मन मुद्दाम मी मोकळे करतोय आज. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. मी मंत्रिपद मागितलेच नाही. पण सुभाष देसाईंना देताय आणि मला नाही म्हणता.. म्हणून मला वाईट वाटले त्याचे. द्या ना तुम्ही मंत्रिपदे नवीन मुलांना..याच गोष्टीचे मला जास्त दु:ख झाले.

शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिरसावंद्य आहे मला. कुठेही त्यात दुमत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो.. प्रस्ताव असा ठेवला होता की, मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता आमची वय झालेली आहेत. आता आम्हाला बाजूला ठेवा तिघांनाही आणि नवीन लोकांना संधी द्या. असा प्रस्ताव मी ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.