गद्दार कोण; मी एक शिवसैनिक काय दखल घ्यायची ती पक्ष घेईल- परब

रामदास कदमांच्या आरोपानंतर मंत्री अनिल परबांची प्रतिक्रिया

0

रयतसाक्षी: शिवसेनेचे आमदार तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले. पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘जे मंत्री हरामखोरी करीत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपविण्याचा, रामदास कदमला संपविण्याचा घाट घातला आहे.’

अशी गंभीर टीका रामदास कदम यांनी अनिल परबांवर केली होती. त्यावर आता अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावर अनिल परब यांनी मात्र बोलणे टाळले आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल. असे अनिल परब म्हणाले.

कदमांचे परबांवर टीकास्त्र
‘अनिल परबांनी रत्नागिरी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ते जिल्ह्यात येतात. पण आता आम्हाला संपवण्यासाठी अनिल परब तीन-तीन दिवस जिल्ह्यात येऊन ठाण मांडत आहेत.’ ‘उद्धवजींना तुम्ही मदत करत असाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही दुसऱ्या नेत्याला संपवा असा होत नाही. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी प्रयत्न केले होते. पण तसे झाले नाही. म्हणून सुडाची भावना ठेवत अनिल परब आता माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे.’ अशी गंभीर टीका रामदास यांनी केली आहे. पुढे रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परबांच्या प्रॉपर्टीबद्दल बोललो म्हणजे मी पक्षाबद्दल बोललो असे होत नाही. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता.’ असे देखील रामदास कदम म्हणाले.

गद्दार कोण?
‘गद्दार कोण’ अनिल परब की रामदास कदम? मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करतात आणि आमच्या मुलाच्या जीवावर उठतात. दापोली आणि मंडणगड येथे योगेश कदम स्थानिक आमदार आहेत. परंतु अनिल परबांनी स्थानिक जिल्हाप्रमुखांना हाताशी घेऊन थेट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अनिल परब हा शिवसेनेच्या मुळावर उठलेला आहे. निष्ठावंतांची हकालपट्टी करत बाटग्यांना अनिल परबांनी तिकिटे दिली. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख होते’ असे म्हणत रामदास कदमांनी अनिल परबांचा मोठा पाढाच वाचला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.