अल्पसंख्याक समूहाने आपल्या अधिकारा प्रति जागरूक असले पाहिजे- प्रा.डॉ वाघमारे

कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड येथे आयोजित 'अल्पसंख्यांक हक्क दिन' कार्यक्रमात ते बोलत होते.

0

नांदेड, रयतसाक्षी: अल्पसंख्यांक समूहाने आपल्या अधिकारा प्रती जागरुक असले पाहिजे कारण अधिकाराची माहिती असल्याशिवाय अल्पसंख्यांक समूहाला आपला विकास करता येणार नाही असे प्रतिपादन संशोधक विचारक प्रा.डॉ. प्रमोद वाघमारे यांनी केले ते कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड येथे आयोजित ‘अल्पसंख्यांक हक्क दिन’ कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाची सुरूवात संविधाना प्रति पुष्प अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राज्यशास्त्राचे अभ्यासक नामांतर चळवळीचे संशोधनात्मक लिखाण करणारे प्रा. डॉ. प्रमोद वाघमारे हे होते. प्रस्ताविक प्रा. मझरोद्दीन यांनी केले. डाॅ. वाघमारे पुढे म्हणाले की भारतात बौद्ध, जैन, शिख, ख्रिश्चन,पारसी आणि मुस्लिम हे धार्मिक आधारावर अल्पसंख्यांक मानले जातात.

तर ,भारतातील राज्यामध्ये राज्यभाषेव्यतिरिक्त इतर भाषा मातृभाषा असलेल्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक म्हणून गणण्यात येते. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक समुदाय प्रत्येक राज्यात भिन्न असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक गणण्यात येते.

या अल्पसंख्यांकांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले आहे. तसेच १९९२ पासून संयुक्त राष्ट्र संघाने देखील अल्पसंख्यांकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी विविध उपाय योजना सुचवल्या आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक समाज त्या त्या देशात अल्प असून देखील व्यवस्थितपणे जीवन व्यतीत करू शकतो. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. उस्मान गणी यांनी केला.

अल्पसंख्यांकांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले आहे. तसेच 1992 पासून संयुक्त राष्ट्र संघाने देखील अल्पसंख्यांकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी विविध उपाय योजना सुचवल्या आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक समाज त्या त्या देशात अल्प असून देखील व्यवस्थितपणे जीवन व्यतीत करू शकतो.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. उस्मान गणी यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब भूकतरे यांनी केले तर आभार प्रा.दानिश यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्रा. कोंडेवार , प्रा.अब्दुल आहाद, प्रा. शेख सोहेल आमेर, प्रा. फरजाना बेगम प्रा. सबा कौसर, प्रा.हिना कुरेशी, प्रा.पतंगे, प्रा. खान नदीम परवेज, प्रा.नजीर शेख, समीना रियाज खान प्रा.सुभाष रगडे,प्रा.सुमित बिडवई,प्रा.मो. निजामुद्दीन इनामदार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भूकतरे,मोहम्मद फराज, मोहम्मद मोहसीन, प्रभावती मॅडम , अमरिन बेगम,मोहम्मदी बेगम आणि अक्षय हासेवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.