झटपट श्रीमंतीच्या हव्यासापायी चक्क गांजाची शेती

१४३ झाडं हस्तगत ; ७६.६९ किलो गांजा जप्त, आरोपीस अटक

0

 

वसमत, रयतसाक्षी : गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी प्रतिबंध असताना मुबलक पैशाच्या हव्यासापायी शेती पिकांमध्ये प्रतिबंधीत पिकं घेण्याचे प्रकार घडत आहेत . वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याने अवैद्य पद्धतीने गांजाची शेती केल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. खातरजमा करून पोलिसांनी शेतावर छापा मारत शेतकऱ्याकडून तब्बल ७६.६९ किलो गांजा जप्त केला व बहरात आलेले १४३ गांजाचे झाडे हस्तगत केली आहे. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंडा (ता. वसमत) येथील उत्तम मारोतराव भालेराव ५५ वर्षे यांनी अधिक पैश्याच्या हव्यासापायी पारंपारीक शेती पिकात अवैद्य पद्धतीने गांजाचे अंतर पिक घघेतल्याची गुप्त माहिती हिंगोली पोलिसांना मिळाली होती. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासगर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यतीश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी वसमत किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या पथकाने गांजाच्या शेतीवर छापा टाकून ७६.६९ किलो गांजा व बहरात आलेले १४३ गांजा चे झाडे हस्तगत केली.

दरम्यान या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हयात यापूर्वी सेनगाव, कलमनुरी , वसमत तालुक्यात ऊस, कापूस, झेंडू आदी पिकात अंतरपीक म्हणुन गांजा लागवड केल्याचे उघडकीस आले होते. मात्र पुन्हा एकदा या क्षेत्रातील लोकांनी डोके वर काढायला सुरूवात केली आहे.
अनेक वेळा तालुक्यांत अवैध धंद्यावर दर एक दोन महिन्याला छापे पडतात कार्यवाही होते परंतु अवैध व्यवसायिक काही त्यांचे उद्योग सोडायला तयार नाहीत, असे चित्र आहे. मागील दोन वर्षांमध्ये वसमत तालुक्यात मोठा गांजा पकडला गेला होता. या मागचा मास्टर माईंड नेमका कोण आहे. याचा पोलीस तपास करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.