छत्रपतींचा दुग्धाभिषेक:बंगळुरूतील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुग्धाभिषेक

0

रयतसाक्षी: कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याटची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा शिवप्रेमींकडून तसेच राजकारण्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी या घटनेचा निषेध केला जातोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलांनी याविषयी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. रविवारी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील.’

दरम्यान बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमानप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेकप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी 27 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे राज्यातही ठिकठिकाणी पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.