परिसर सुंदर तर जिल्हा, देश सुंदर-सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

गावचा विकास शासनाच्या विविध योजनेअंतर्गत करण्यात येईल त्यासाठी आपला गाव स्वच्छ केला पाहिजे.

0

नांदेड, रयतसाक्षी(चंद्रकांत गव्हाणे): आजादी का महोत्सव कार्यक्रमांतर्गत मौजे त्रिकूट देवस्थानाचा तीर्थक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली या गावचा विकास शासनाच्या विविध योजनेअंतर्गत करण्यात येईल त्यासाठी आपला गाव स्वच्छ केला पाहिजे.

गावचा विकास झाला तर ,आपल्या जिल्ह्याच्या विकास होईल .जिल्ह्याचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.

तीर्थक्षेत्र त्रिकूट येथे डिसेंबर (दि.१७ ते २३) या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिकूट व ब्राह्मणवाडा या गावच्या विकासासाठी ग्रामस्थांना योग्य ती संधी उपलब्ध झाली आहे.

त्याचा फायदा त्यांनी घ्यावा या परिसरातील जनतेला ही सुवर्ण संधी आहे या भागाचा विकास व्हावा म्हणून नदीचे सुशोभित व स्वच्छता करण्यात येईल तसेच येथे सुंदर निसर्ग रम्य बगीच्या निर्मिती करण्यात येईल हे त्यांच्यासाठी मनमोहक व प्रदूषण मुक्त परिसर करण्यासाठी प्रत्येकांनी पुढे यावे असेही आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

रविवारी या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते . दरम्यान मॅरेथॉन स्पर्धेत आज त्यांच्या हस्ते ध्वज फडकावून मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे .उपविभागीय अधिकारी किशोर माने .वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कसबे मुख्य पुजारी गुरुद्वारा माता साहिब देवाजी बुद्धा दल मुगट चे जथेदार बाबा गुरुगोविंद सिंग जी .जिल्हा क्रीडा अधिकारी आर .एस .मारावार तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकराव बुक्‍तरे .

नायब तहसीलदार डी.पी मरळे .मुगाजी काकडे .श्रीराम पाटील वडजे. सरपंच नागोराव वडजे. मंडळाधिकारी कागणे. प्रलोभ कुलकर्णी .बंटी सोनसळे विजय गव्हाणे. रूपाली आडगावकर . बालाजी जोगदंड दिनेश उमरेकर . गुरु दीपक जी सिंग संधू . गुलाब सिंग जी महाराज .एकनाथ ब्राह्मणवाडे कर वैभव दमकों दवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .

या मॅरेथॉन स्पर्धेत विविध शाळेतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता .तसेच गावातील अनेक जणांनी या परिसरातील कार्यक्रमाचा आनंद घेतला

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.