शेतकऱ्याच्या मुलाने तयार केले अल्बम साँग

'ओढ लागली तुझ्या मनाची' गीताचे युवकांना आकर्षण

0

शिरूरकासार , रयतसाक्षी: इथल्या मातीने देश पातळीवर विविध क्षेत्रासाठी अनन्यसाधारण व्यक्ती घडविले आहेत. इथल्या मातीतुन दुरवळणा-या सुगंधाने देशाच्या मौलिक अशा सर्वच क्षेत्राला जणु काही व्यक्ती महत्वाची भुरळच घातली‌ असावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शामराव थोरवे या युवकाने अभिनय क्षेत्रात भरारी घेतली असुन एका नवीन मराठी अल्बम साँगचे नुकतेच चित्रीकरण झाले आहे. ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ हे रविवारी (दि. १९ ) प्रदर्शित झालेले गीत युवकांना आकर्षित करत आहे. पिंपळेवाडी येथील सामान्य कुटुंबातील शामराव थोरवे याने पुण्यात शिक्षण घेत असताना कलेची आवड जोपासत ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ या गीतात अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

इंस्टाग्राम रील्स स्टार तेजस्विनी जाधव हिने साथ दिली. एस. टी. प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर ‘ओढ लागली तुझ्या मनाची’ हे गीत प्रदर्शित झाले आहे. तसेच मोशन पोस्टर त्यांच्या टीमने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. लवकरच ओढ लागली हे गीत वाहिन्यावरती सुद्धा येत आहे.

गीतकार डॉ. अशोक त्रिंबके आणि रश्मी पाटील यांचा आवाज, तर चिन्मय जोग यांचे संगीत संयोजन या गीतासाठी लाभले असून नितीन साळुंके यांनी दिग्दर्शन केले आहे. राम शिंदे आणि राहुल त्रिंबके यांची निर्मिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.