जन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील वन्यजीवांचे निसर्गार्पण

उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या कोल्हा, खोकड ,उदमांजर, काळवीट,अजगरास केले निसर्गात मुक्त

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्पराज्ञीतील उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या पाच वन्यजीवांचे विभागीय वन अधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गार्पण करण्यात आले.

 

सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र हे तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे असून गेल्या दोन तपासून हा प्रकल्प सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे शासनाच्या मदतीशिवाय निस्वार्थ भावनेने लोकसहभागातून चालवतात.

या दोन तपापासून चालू असलेल्या या प्रकल्पाने आजतागायत जवळपास १६,००० हजार जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.

सर्पराज्ञीत गेल्या काही दिवसापासून उपचारासाठी दाखल असलेले व उपचारानंतर पूर्ण बरे झालेले निसर्गात जगण्यास समर्थ झालेले कोल्हा, खोकड, उदमांजर काळवीट व अजगर या प्राण्यांना दत्तजयंतीचे व सर्पराज्ञीचे मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दत्त जयंती दिनी विभागीय वन अधिकारी सचिन कंद व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मूळ अधिवासात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर …यांनी आरोग्य तपासणी करुन. त्यांच्या उपस्थितीत निसर्गात सोडून देण्यात आले.

यावेळी सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे, वनपाल साधू धसे , वनरक्षक बद्रीनाथ परजने, वनमजूर शिवाजी आघाव, दिपक थोरात,सोनल थोरात ,दिक्षा वाकडे, आदी उपस्थित होते.

सोडण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये झाडावरून खाली पडून जखमी झालेले उदमांजर, ऊस तोडणीच्या वेळी उसाच्या फडात आढळून आलेला एक अजगर व सहा महिनाभरापूर्वी जखमी अवस्थेत आढळला खोकड. विहिरी मध्ये पडलेला एक कोल्हा आणि कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले एक काळवीट उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याने काल दत्त जयंतीचे औचित्य साधून त्यांना निसर्गात मुक्त केले.
– सृष्टी सोनवणे
(संचालिका सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.