बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे’

संभाजीराजे छत्रपती यांनी ही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

0

कोल्हापूर , रयतसाक्षी: कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी,अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.