पंकजाताई माझी औकात काढताय? 32 हजार मतांनी पराभूत केले हीच माझी औकात!

धनंजनय मुंडेंचा पंकजांवर घणाघात

0

बीड, रयतसाक्षी: आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत, पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजार मतांनी नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांना लगावला.

मला 32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत आहात, पंकजाताई 2019 चा पराभव विसरलात का? तुम्ही चार विभागाच्या मंत्री होत्या, त्यावेळी परळीच्या जनतेने तुम्हाला तुमची औकात दाखवून दिल. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिले आहे.

केज नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेना प्रतिउत्तर दिले आहे. बीडमध्ये मुंडे बहीण-भावात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीवरून चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. नगरपंचायतच्या निवडणूक आखाड्यात पंकजा आणि धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यातच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जुगलबंदी सुरू झाली.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे म्हणाले की, केजमध्ये भाजपच नाही. एक काळ आम्ही असा पाहिला, त्या काळात कमळाला एक जरी मत मिळाले तरी कमळाचे चिन्ह द्यायचे. आता अशी वेळ आली आहे की, कमळावर मत आले नाही तर कमळच काढून घ्यायचे आणि दुसरे उभे करायचे. असे आष्टीतही केले गेले. तीन वॉर्डात कमळ नाही. देशात शतप्रतिशत कमळ आहे तर आष्टीच्या तीन ठिकाणी कमळ का नाही, कारण तुम्हाला माहितीये, तिथे कमळाला मत मिळत नाहीत. असे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले की, ‘ इथे आमची औकात काढणाऱ्याला आष्टीच्या जनतेने दाखवलंय. नगर पंचायत निवडणुकीत दिवा बत्ती, घरकुल, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, नाली, काढणे आणि करणे आमचे कर्तव्य आहे. कुणी म्हणत असेल आम्ही विकास केला तर ते तुमचे कर्तव्य आहे. मी परळीत रस्ते, नाली, सभागृह केले असेल तर ते माझे कर्तव्य आहे. माझ्या दृष्टीने विकास काय तर असे काम करू की तुमच्या घरी, तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. यालाच आम्ही विकास म्हणतो. असे धनंजय मुंडे म्हणाले.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

‘पालकमंत्री बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात नगरपंचायतीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतात. जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींना पाचशे कोटी देणार आहेत, तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय? जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कुणाला तुरुंगामध्ये टाकायचे. कुणाचे घर बर्बाद करायचे, असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवले नाही”, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. आमचो सरकार होते, तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांत होते. मी काही 32व्या क्रमांकाची मंत्री नव्हते. यांचे भविष्य फार चांगले नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आपल्या बहीणीच्या याच टीकेला आत्ता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडेंनी काय दिले उत्तर?

भाजपचे कमळ आता बीडमधून गायब झाले आहे. केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार भाजपला मिळत नाही. एवढी वाईट परिस्थिती आता भाजपवर आली आहे. साधा एक उमेदवार उभा करता आला नाही तुम्हाला अन तुम्ही माझी औकात काढता. ताई औकात काढताना दोन वर्षापूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वर टीका करा. कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा मी कधी तुम्ही टीका केली असेल. पण आज तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. ताई आज सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.