मुंडेvsमुंडे :खातं ३२ नंबरचा असुद्या काम‌एक नंबरचा करतोय मंत्री धनंजय मुंडे यांचा पंकजावर पलटवार

ज्या सामाजिक न्याय विभागाची निर्मीती परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

0

रयतसाक्षी :माजी पालकमंत्री आमच्या ताईसाहेब मला म्हटल्या आमची अवकात काय आहे. मोठा भाऊ आहे राव मी २०१९ च्या परळीच्या विधानसभा निकालानंतर ३२००० मताने पाडून सुद्धा माझी अवकात काय आहे. माझ्यावर धनंजय मुंडे म्हणून काय टिका करायची ती करा .

पण ज्या विभागाचा मी मंत्री आहे ते सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला ताईसाहेब तुम्ही हिनवल कदाचीत हे ३२ नंबरचा खातं म्हटले यांची काय औकात आहे. खातं ३२ नंबरचा असू द्या काम आम्ही एक नंबरचा करतोय तिथं पण बोलताना तुम्ही औकात माझी काढायची होती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागणी नाही ज्या सामाजिक न्याय विभागाची निर्मीती परमपुज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

या सामाजिक‌विभागामध्ये वंचितातला वंचित माणुस आहे. त्याला न्याय देण्यासाठी सामाजिक विभाग आहे. म्हणून त्याला कमी लेखता या सामाजिक न्याय लिखाण वंचितांच्या वंचित जाती आहेत . राज्यातील ३५ टक्के जातीतील लोकांचा संबंध या सामाजिक न्याय विभागाशी आहे.आसच तोला मोलांच काम विशेष सहाय्य विभागाचं आहे.

निराधारांचं काम याचविभागाशी आहे तुम्ही कशाला बत्तीस नंबर सांगताय श्रावणबाळच्या पडली इथुनच आहेत रमाई आवास योजनाही इथुनच आहे. जेष्ठ नागरिकही इथंच आहेत दिव्यांग इथंच आहेत . किन्नर इथंच आहेत एवढंच नाहीत तर ऊसतोड मजुरांच सुद्धा महामंडळ मी स्वतः: सरकारला विनंती करून मंत्री म्हणून लेबरकडून या विभाकडं घेतलं .तुम्ही मला ३२ नंबर चा म्हणून अपमान करता. तुमच्याकड किती नंबरचे आणि किती खाते होते हे आम्ही नाही बघीतले.

महिला बालकल्याण,ग्रामीण विकास मध्यंतरीच्या काळात जलसंधारण आणि आम्ही विरोधी पक्षनेते होतो. शरद पवार साहेबांच्या कृपेने ३२ हजार मतांनी मारून आमची अलंकार तुम्ही एवढ्या खात्याचे मंत्री होतात ना .

मी २५ वर्षाच्या काळात अनेक निवडणुका पाहिल्या सोसायटीपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, विधानसभा लोकसभा एकदा एकदा राष्ट्रपतीची निवडणूक झाली होती ती सुद्धा सगळ्या निवडणुका पाहिल्या. नगरपंचायतीची निवडणूक होते असली निवडणूक मला कधीच पाहायला मिळाली नाही .

अर्धी आता अर्धी पुढच्या महिण्यात. उमेदवारांसह पक्षाची अशी‌पंचायित आहे . मतदान उद्या करायचं अर्ध्या चित्रपटाचं आणि‌ मध्यांतरा नंतर बाकी मतदान करायचं दि. १८ जानेवारीला . मतदारांची पंचायत ‌अशी ज्याने उद्या मतदान केलय त्याला १९ पर्यंत कोणाला मतदान केलं हे‌सांगताच येत नाही. मतदाराजा हूशार‌ आहे सगळ्यांना हो म्हणणा-या मतदारांची ही पंचायित झाली आहे.

माझं आणि शिरूरचं आगळ‌ वेगळ नात आहे . शिरूरला आलो त्या वेळेस माझ्यासाठी मोठं फळ मिळत गेलं .२००७ मध्ये शिरूरला मोटरसायकलवर होतो त्या वेळेस माझ्या जुन्या (भाजपा)पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांच्या फोन आला की तुम्ही आता पक्षाच्या राज्याच्या युवकचे अध्यक्ष होणार. त्याप्रमाणे आमचे‌युवकाध्यक्ष शिरूरला आहेत.

२५ वर्षापूर्वीच शिरूर जशास तसं आहे. काही फरक नाही . जगात एकमेव शिरूर कासार ची आत्ताची माणसं जिवंत होतात ही स्कीम‌ आहे . असं जर असेल तर कोविड संसर्गामुळे देशातील जेवढे मृत्यू झालेत तेवढ्यासाठी परत आणण्याचं काम करा . अजब आहे सगळं असा कारभार पाहीलाच नाही .

उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने जेवढ्या धनी विकासाचा‌शब्द दिलाय तेवढी जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी इथं आलोय . शहराच्या नगरपंचातीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला शिवाय‌राहणार‌नाही असा‌ विश्वास आहे .

या आष्टी पाटोद्याचे भुलभुलैय्या हळुच पोटात घुसतो आणि पोट फोडून बाहेर पडतो . अलिबाबा अन् चालिस चोर म्हणे चाळीस चे ८० झाले आता यांनी चक्क म्हण बदलली. अजब कारभार आहे जमिन कोणाची विकतय कोन मृत व्यक्ती जिवंत काय होतंय नगरपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढत आमदार धसांचे नाव न घेता चौफेर टिका केली. सत्ता मिळाल्यास ५० कोटींच्या‌कामांचे भुमिपुजनाचे अश्वासन देत मतदारांना अवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.