परळी तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात दोन ठार

उसतोड मजुरांना घेऊन गावाकडे परत निघालेले वाहन परळी तालुक्यातील सरफराजपूर जवळ पलटी झाले.

0

परळी , रयतसाक्षी: ऊसतोडणीला गेलेल्या उसतोड मजुरांना घेऊन गावाकडे परत निघालेले वाहन परळी तालुक्यातील सरफराजपूर जवळ पलटी झाले.

या अपघातात दोघे जणजागीच ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व मजूर धारूर तालुक्यातील कोयाळ येथील आहेत.हा अपघात सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास झाला. सुत्रांच्या माहितीनुसार,धारूर तालुक्यातील कोयाळ येथील ऊसतोड कामगार सोमवारी सकाळीऊसतोडणीसाठी गेले होते.

रात्री कोयाळला परत येत असताना सरफराजपूरनजीक चालकाचे नियंत्रण सुटून त्यांचे चारचाकीवाहन पलटी झाले. या अपघातात डोक्यालाजबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे (वय १८) आणि वैजनाथ रामा वाव्हळे (वय ६५) दोन्ही रा. कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर,जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५),विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०),रमेश भगवान मुंडे (३४) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (६०),

शोभा गायकवाड (५५) दोन्ही वाहन पलटी झाले. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे (वय१८) आणि वैजनाथ रामावाव्हळे (वय ६५) दोन्ही रा. कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर,

जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०),रमेश भगवान मुंडे (३४) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (६०),आणि संजय दासू डोंगरे (५०) रा. हिंगणी हे सात जण जखमी झाले.

अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्यास्वाराती रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी बाळासाहेब मुंडे यांचीप्रकृती चिंताजनकअसल्याने त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे तर इतरांवरअंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.