पुरोगामी शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी‌योगेश गायकवाड यांची निवड

जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांच्यासह संघटनेच्या‌ पदाधिका-यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

0
  • रयतसाक्षी: पुरोगामी शिक्षक संघटना तालुका शाखा नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नांदेड तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पूर्व तालुकाध्यक्ष जनार्दन कदम यांची पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हा मुख्य संघटक पदी निवड झाल्याने रिक्त नांदेड तालुका अध्यक्षपदी योगेश गायकवाड यांची निवड करण्यात आहे.

संघटनेच्या नांदेड तालुकाध्यक्षाचा तात्पुरता पदभार सरचिटणीस योगेश गायकवाड यांच्याकडे होता. कार्यकारिणी निवड बैठकीचे रविवारी आयोजन ‌करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे होते. तर राज्य उपाध्यक्ष जी.एस मंगनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा उपाध्यक्ष जी.बी .मोरे, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी पेटकर

जिल्हा सल्लागार लक्ष्मीकांत कोंडावार ,हदगाव तालुकाध्यक्ष नागनाथ गाभणे ,जिल्हा संघटक गणपत बोथीकर ,नांदेड तालुका उपाध्यक्ष शंकर मुनलोड, शिक्षक नेते विजय इंदुरकर , सदाशिव कापसे ,कोरडे पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड तालुका अध्यक्षपदी योगेश गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

नांदेड तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्न /समस्या सोडविण्यासाठी योगेश गायकवाड हे योग्य व्यक्तिमत्व आहे.म्हणूनच पुरोगामी शिक्षक संघटना नांदेड तालुक्यातील तमाम तमाम शिक्षकांना न्याय देण्यासाठी पुरोगामी सदैव शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही नुतन तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी दिली.

निवडीचा प्रस्ताव माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मुख्य संघटक जनार्दन कदम यांनी प्रस्ताव मांडला तर अनुमोदन जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, यांनी अनुमती देऊन सदर निवड एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या संघटनात्मक कार्यास पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा नांदेड जिल्हा शाखा नेहमी त्यांच्या सदैव पाठीशी राहील .
दरम्यान , उर्वरित कार्यकारणी चे सर्व अधिकार तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड यांना देण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांच्यासह संघटनेच्या‌ पदाधिका-यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.