झेडपी शाळेच्या शिक्षीकेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्याध्यापक,शिक्षीतेल वाद विकोपाला

0

 

बीड, रयतसाक्षी : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका संगीता राठोड यांनी शनिवारी (दि.4) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान विष पिऊन आत्महयेचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत संगिता राठोड यांना शहरातील खासगी रुग्णयलायत उपचारार्थ दाखल केले आहे.
दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षीकेमध्ये अनेक दिवसांपासून वाद आहे.

राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि सहशिक्षीका संगीता राठोड यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद आहे. कोरोनाच्या प्रदूर्भावानंतर दीड वर्षानंतर शाळा उघडल्याने त्यांच्यातील हा वाद चव्हाट्यावर आला.

शाळेतच मुलांसमोर दोघांतील अंतर्गत वाद होऊ लागल्याने याची कुणकुण गावातील पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांना लागली. त्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने दोघांचा वाद मिटवण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्याना निवेदन देऊन पालकांनी शाळा बंद ठेवली होती.

या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण भेडसकर यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोघांची सोमवारी (ता. सहा) सुनावणी ठेवली होती. त्याअगोदरच शिक्षिकेला संगीता राठोड या शनिवारी (ता. चार) सकाळी राजेवाडी येथे शाळेत गेल्यानंतर दुपारी विष घेतले.

यामुळे शाळेतील शिक्षक घाबरून गेले. त्यांनी तात्काळ संगीता राठोड यांना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्याध्यापकांच्या वादातूनच शिक्षिका राठोड यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.