विठ्ठल जाधव यांची ‘पिपाणी’कविता साता समुद्रापार

एशिएन पोयट्री' अंतर्गत बालकवितेची निवड

0

बीड, शिरूर कासार, रयतसाक्षी: आशिया खंडातील बारा देशांमधून विविध भाषांमधील कविता ‘एशियन पोयट्री’ अंतर्गत प्रसारित करण्यात येत असून कोकणी आणि मराठी भाषेतील कवितांमध्ये विठ्ठल जाधव यांच्या ‘पिपाणी’ या कवितेची निवड झाली असल्याचे डॉ. साहेब खंदारे यांनी कळविले आहे.

मराठी भाषेसाठी गोवा आणि महाराष्ट्रातून बालसाहित्य, ग्रामीण, गझल, अभंग या प्रकारांतील निवडक कविता ४४ देशांतून प्रसारित होणार आहेत. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या कवितांमध्ये विठ्ठल जाधव यांच्या ‘पिपाणी’ या बालकवितेची निवड झाली असल्याचे ‘एशिएन पोयट्री’ चे डॉ. साहेब खंदारे यांचेसह डॉ. हबीब भंडारे यांनी कळविले आहे.

त्यामुळे ‘पिपाणी’ कविता ४४ देशांमध्ये विविध भाषा, माध्यमातून वाचण्यास, पाहण्यास उपलब्ध होत आहे. जाधव यांचे साहित्य सातासमुद्रापार जात असल्याने गावखेड्यातील लेखकाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

तिवढा, गर्भकळा, पांढरा कावळा, उंदरीन सुंदरीन, मानवता व्हाऊचर, बटाटीची धार अशी दर्जेदार ग्रंथ प्रकाशित असलेले विठ्ठल जाधव यांच्या साहित्य संपदेवर काही विद्यार्थी संशोधन प्रबंधही करत आहेत. अत्यंत प्रतिकुलतेवर मात करत ते वंचितांचे प्रश्न कथा, कविता, कादंबरी, लेखाच्या माध्यमातून मांडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.