त्रिकुट येथे चित्रकला व गीतगायन स्पर्धेचे आयोजन

चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन, फोटोग्राफी इत्यादी उपक्रमातर्गंत कार्यक्रम संपन्न झाले.  

0

नांदेड, रयतसाक्षी:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षे व  रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन आज करण्यात आले होते. त्रिकुट पंचक्रोशीतील गावांसह इतर तालुक्यातून सुमारे 309 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन, फोटोग्राफी इत्यादी उपक्रमातर्गंत कार्यक्रम संपन्न झाले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी मुगाजी काकडे, उपशिक्षणाधिकारी बनसोडे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, गटशिक्षणाधिकारी राजेंद्रजी रोटे, विस्तार अधिकारी अरुणा घोडसे, ग्रामसेवक गुरमे, शोभा भारती, श्री. खेडकर, निजाम शेख, मेकाले, श्री. मुंगल, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमूख  यांची उपस्थिती होती.

आज घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत केंद्रीय प्रा. शाळा वाजेगाव येथील इयत्ता 1 ते 5 विद्यार्थी प्रथम तर इयत्ता 6 वी ते 10 मधील सना हायस्कूल ची विद्यार्थी द्वितीय व ज्ञान भारती विद्यार्थी मंदिरचे विद्यार्थी तृतीय. चित्रकला स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव इयत्ता पहिली ते पाचवी कु. तनुजा पचलिंगे प्रथम क्रमांक, प्रा. शाळा इंजेगाव श्रध्दा पुयड द्वितीय, प्रा. शाळा पुणेगाव शालिनी खाडे तृतीय.

गट दुसरा 6 ते 10 क्रमांक ज्ञान भारती विद्या मंदिर नांदेडचा रुद्राक्ष तेलंगे प्रथम क्रमांक, सना उर्दू हायस्कूल नांदेड येथील सायरा मरीयम द्वितीय क्रमांक, याच शाळेतील मनिया खान तृतीय क्रमांक .

गट तिसरा प्रथम क्रमांक शिवाजी हायस्कूलची तेजस्विनी प्रथम क्रमांक, श्रुती अथवाळे द्वितीय क्रमांक, अंकिता मेकाले तृतीय क्रमांक आहेत. विशेष प्रोत्सहान पर बक्षिस वितरण करुन मान्यवरांच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.