अवकाळीचा कहर गोठ्यावर विज कोसळली

बैलजोडीसह‌ म्हैस दगावली; आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण ची घटना,

0

 

आष्टी, रयतसाक्षी : आठवडाभरापासून अवकाळी पावसाने शेती पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शनिवारी (दि.४) तालुक्यातील सांगवी पाटण शिवारातील बद्रिनाथ रामहरी भोसले यांच्या जनावरांच्या गोठ्यावर विज कोसळल्याने बैलजोडीसह एक म्हशीचा होरपळून मृत्यू झाला.

 

रब्बीसाठी पोषक असणार्या अवकाळीच्या हलक्या सरींचा खरिपातील कापुस, तुर आदी पिकांवर मात्र दूषित परिणाम होत आहे. आठवडाभरापासून कोसळणारा अवकाळी पाऊस व सुर्य दर्शनाअभावी दूषित हवामान त्यातच थंडीची लाट असा तिहेरी ॠतूचा अनुभव मिळत असला तरी शुक्रवारी (दि.३) सांगवी पाटण येथील बद्रिनाथ रामहरी भोसले यांनी जनावरांना सायंकाळी चारा-पाणी करून त्यांना गोठ्यात निवार्याला बांधले होते.

आधिच हालाखिची परिस्थिती,त्यातच दिवसरात्र मेहनत करून थोडी फार उसनवारी करून घेतलेली एक बैलजोडी आणि दुभत्या म्हशीला पोटच्या लेकराप्रमाणे संगोपन सुरू होते. पण शुक्रवारी रात्री अवकाळी पावसात त्यांच्या जनावरांच्या गोठ्यावर विज कोसळली. यात बैलजोडीसह म्हशीचा मृत्यू झाला .

 

पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अरूण तुराळे यांनी शवविच्छेदन केले. बद्रिनाथ रामहरी भोसले यांनी उसनवारीसह पर्यायी रिन काढून कमावलेल्या बैल जोडी सह दूभत्या म्हशीच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

कृ.ऊ.बा समिती कडा मा. सभापती शत्रुघ्न बापू मरकड, पंचायत समिती सदस्य रावसाहेब आबा लोखंडे,सरपंच दत्तात्रय आबा खोट,उपसरपंच अमोल खिलारे,जगन्नाथ खिलारे,सद्दाम शेख,बाबसाहेब झरकर,जालू भोसले,ऋषिकेश खोटे,उद्घव भोसले,मारूती गवारे,योगेश भोसले,पत्रकार समीर शेख. सांगवी पाटण गावचे तलाठी बी. एस .कव्हळे,यांनी पंचनामा केला तर वैद्यकीय अधिकारी डॉ.यांनी पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.