अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील१९ विद्यार्थी ‌कोरोना‌ बाधीत

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय

0

अहमदनगर, रयतसाक्षी: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळले असून यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली.

इयत्ता दहावी व बारावीची अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालय मध्ये बाहेरून आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून बाधा झाली असण्याची शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासन व पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. या नवोदय विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्यामुळे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोणाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने उर्वरित विद्यार्थी तपासणी शुक्रवारी सकाळी केली असता १० विद्यार्थ्यांना कोरोना बाधित व एका संगीत शिक्षकाला गुरुवारी बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे या १९ जणांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.