राज्यस्तरी आढावा बैठकीत जिल्हा काँग्रेस अनु जाती विभाचा वार्षिक अहवाल सादर

प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून कार्य अहवाल पाहून दत्ता कांबळे यांचे कौतुक

0

माजलगाव, रयतसाक्षी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील टिळक भवन या मध्यवर्ती कार्यालयात प्रदेश पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त आढावा बैठक प्रदेश प्रभारी मनोज बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

पक्षीय संघटन बांधणीसह विविध विषावर सखोल चर्चा झाली.या बैठकीत जिल्हाचे प्रतिनिधी म्हणून अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांची उपस्थिती होती. दरम्यान वार्षिक अहवाल सादर करत असताना कोविड काळातील सर्वसामान्य लोकांना केलेली मदत व सामाजिक कार्यकर्त्यांचे झालेले पक्षीय प्रवेश व जोरदार पक्ष संघटन बांधणी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांनी जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत पुन्हा एकदा नेतृत्व सिद्ध केलं.

येणाऱ्या काळात जिल्ह्याला विविध माध्यमातून पक्ष उभारण्यासाठी लागेल तेवढं बळ देणार असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष यांनी दिली .यावेळी या प्रमुख राज्यस्तरीय बैठकीस प्रदेश प्रभारी मनोज बागडी,प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे , प्रदेश उपाध्यक्षभाई नगराळे,गौतम अरखडे,प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार ,सरचिटणीस राहुल साळवे सह सर्व प्रदेश उपाध्यक्ष ,प्रदेश समन्वयक ,जिल्हा कार्याध्यक्ष व राज्यभरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.