‘ हनी ट्रॅप ‘ साठी विश्वासार्ह महिला मिळेना म्हणून चक्क…

कोल्हापुरात व्यावसायिकाला लाखो रुपयांना गंडा, सहा जनांविरोधात गुन्हा दाखल

0

 

कोल्हापुर, रयतसाक्षी: गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर हे राज्यातील हनी ट्रॅप रॅकेटचा केंद्रबिंदू ठरावा इतपत घटना एकट्या कोल्हापूरमध्ये उघडकीस आल्या आहेत.

नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेत एका तरुणानं चक्क हनी ट्रॅप प्रकरणी विश्वास ठेवावा अशी दुसरी महिला मिळत नसल्याने चक्क स्वतःच्या बायकोचा वापर करून कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. कागल पोलीस ठाण्यात तब्बल सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्य संशयित महिला प्रिया, प्रियाचा पती, रोहित आणि विजय कलकुटगी अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं असून अन्य दोन आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. संशयित आरोपींनी कोल्हापुरातील लिशा चौक परिसरात व्यापाऱ्याकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले आहेत.

आरोपी विजय कलकुटगी हा सराईत गुन्हेगार असून हनी ट्रॅप प्रकरणी त्याच्यावर कोल्हापुरात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार व्यावसायिक आणि संबंधित महिलेची तिच्या पतीमार्फतच पहिल्यांदा ओळख झाली. एकदा पतीमार्फत ओळख झाल्यावर महिलेने सदर व्यापाऱ्यांशी आर्थिक सधन असल्याचे हेरून मैत्री वाढवली.

आरोपी महिलेनं विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादीला करवीर तालुक्यातील उचगाव, कागल येथील लॉज तसेच सर्विस रोड आणि कोल्हापुरात बोलावून त्याच्याशी शारीरिक संबध ठेवत त्याचे मोबाईलवर अश्लील चित्रीकरण केले.

आता सावज आपल्या टप्पात आलय हे कळल्यानंतर आरोपींनी संबंधित अश्लील फोटो आणि व्हिडीओज व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून लाखो रुपये उकळले मात्र तरीदेखील त्यांचे समाधान होत नसल्याने तक्रारदार व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू होता .

तसेच दरम्यानच्या काळात फिर्यादीला आरोपींनी पैशासाठी मारहाण देखील केल्याचे समोर आले आहे. कागल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.