विज बील मूक्ती व कर्जमुक्ती साठी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन

बॅंक सारखा तगादा लावत आहेत व कर्ज रक्कमेचे व्याज वाढत चालले आहे.

0

आष्टी, रयतसाक्षी : महात्मा ज्योतीबाराव फूले कर्जमुक्ती योजना सन २०१९ला राज्य सरकारने घोषित केली त्याची अंमलबजावणी अजूनही अपूर्ण आहे.दोन लाखावरील पात्र शेतकरी अजूनही लाभाच्या आशेने कर्ज परतफेड करत नाही व बॅंक सारखा तगादा लावत आहेत व कर्ज रक्कमेचे व्याज वाढत चालले आहे.

तसेच नियमीत कर्जदारांना प्रोत्साहन अनूदान अजूनही दिले नाही त्यामुळे वंचित शेतकरी वर्ग हा नाराज आहेत तरी मुख्यमंत्री यांनी याची दखल घेत कर्जमुक्ती योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी करावी.महावितरण कंपनीने बेकायदेशीरपणे वीज पूरवठा खंडीत केला आहे तो पूर्ववत सूरळीत करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज बील मुक्ती द्यावी.

सन २०२१खरीप अतीवृष्टी अनुदान राज्य सरकारने जाहीर केले परंतु फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० रूपये जाहीर करूनही अद्याप देण्यात आले नाही तरी फळबाग अनुदान तात्काळ देण्यात यावे.

ग्रामीण भागातील तलाठी व वायरमन यांनी कामाच्या ठिकाणी खाजगी सहाय्यक ठेवले आहेत व त्यांच्या मार्फत त्यांना आर्थिक लाभ घेता येतो.व ते स्वतः तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार पहातात तरी अशा तलाठी व वायरमन यांची चौकशी करून कारवाई करावी, त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी भाग पाडावे, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आष्टी तहसीलदार मार्फत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दीन,डाँ.राम बोडखे (सरपंच सराटेवडगाव,),रहेमान सय्यद,राजू शिंदे,रिजवान बेग, संभाजी शिंदे,यांनी असे निवेदन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.