जुनी पेन्शन मार्च आंदोलकावरील दाखल गुन्हे मागे घ्या -पुशिसं

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

0

नांदेड, रयतसाक्षी: जूनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विधान भवनावर काढण्यात आलेल्या पेन्शन मार्चच्या आंदोलकावर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलक शिक्षकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या जुनी पेन्शन प्रश्नावर लोकशाही मार्गाने सातत्याने संघर्ष करण्यात येत आहे . शिक्षक संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून मागील काळात विधान भवनावर जूनी पेंन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मार्च काढण्यात आला होता.

न्यायिक मागण्या घेऊन आंदोलनामध्ये सहभागी शिक्षक बांधवांवर शासनाने गुन्हे दाखल करण्याचा जुलूम केला . संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतिने आंदोलंक शिक्षकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे ,जिल्हाध्यक्ष अशोक मोरे , जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा प्रमुख संघटक जे. डी. संघटक , नांदेड तालूकाध्यक्ष योगेश गायकवाड, ता. उपाध्यक्ष शंकर मुंडलोड , लोहा ता. उपाध्यक्ष व्हि. व्ही. नाईक, जिल्हा उपाध्यक्ष जी.बी.मोरे आदी उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख एस एस पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश मोकले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.