राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव

पहिला रूग्न राजधानीच्या उपनगरात , कल्याण डोंबिवलीत खबरदारीच्या निर्देश

0

मुंबई, रयतसाक्षी: जगभरात भीती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या विषाणूने राज्यातही शिरकाव केला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळून आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सापडला होता.

या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. (दि.२४) नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला, त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत.

या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.