सर्पराज्ञीतील सौंदर्यवती लाल हादग्याची निसर्गप्रेमींना भुरळ

देखण्या मोठ्या फुलांची रंगछटा मोहक ; पर्यावरण व आरोग्यासाठी उपयुक्त

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: तालुक्यातील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दुर्मिळ असलेला सौंदर्यवती लाल हादगा बहरला असून त्याच्या फुलांनी निसर्गप्रेमींना भुरळ घातली आहे . मोठ-मोठ्या मोहक फुलांची उधळण डोळ्यांचे पारणे फेडीत आहेत. परिसरातील निसर्गप्रेमींना सर्पराज्ञीची ओढ लागली आहे.
सर्पराज्ञीत उभारण्यात आलेल्या “नंदनवन” दुर्मिळ अति दुर्मिळ वनस्पती जतन केंद्रांमध्ये अतिदुर्मिळ लाल हादगा फुलांनी बहरला आहे.

 

बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच लाल हादगाव बहरलेला आहे. या लाल हादग्याची फुले पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची ओढ लागली आहे .विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी सर्पराज्ञीत “सर्पराज्ञी “दुर्मिळ वृक्ष रोपवाटिका निर्माण करण्यात आली होती .या रोपवाटिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र व मराठवाड्यातून लुप्त झालेल्या
दुर्मिळ अति दुर्मिळ झाडांचे रोपे तयार करण्यात आली होती.

 

या रोपवटीकेसाठी औरंगाबाद येथील निसर्गमित्र मिलिंद कुलकर्णी यांनी मोफत लाल हादग्याच्या बिया विश्वास चौरे यांच्याकडे सर्पराज्ञीसाठी दिल्या होत्या. या बियांपासून सर्पराज्ञीत तीस रोपे तयार करण्यात आली होती. या रोपातून तयार झालेले काही झाडे रोपे सर्पराज्ञीतील “नंदनवन “दुर्मिळ अति दुर्मिळ वनस्पतींचे जतन केंद्रात लावण्यात आली .ही लावण्यात आलेली रोप आता फुलांनी बहरली आहेत.

या लाल हादग्या विषयी माहिती सांगताना सर्पराज्ञी चे संचालक तथा वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले की ,’लाल हादगा हा अत्यंत दुर्मिळ असून तो मराठवाड्यामध्ये क्वचित ठिकाणी पाहावयास मिळत आहे . जगभरात हादग्याच्या ५० जाती आढळून येतात. त्यामध्ये प्रमुख चार मानल्या जातात. त्यामध्ये लाल फुले येणाऱ्या हदग्यास “लोहता” म्हणून ओळखले जाते. तर निळ्या रंगाची फुले असणाऱ्या प्रजातीस “नीला” म्हणतात . पांढऱ्या रंगाची फुले असणाऱ्या प्रजातीस” सीता.” तर पिवळ्या रंगाची फुले असणाऱ्या प्रजातीस” पिता” म्हणून ओळखले जाते.”

मानवी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी ,पशुपक्ष्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे हादग्याचे झाड दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. त्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.हादग्याच्या फुलापासून, पानापासून आणि शेंगा पासून भाजी बनवतात .आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आजारावर पंचांगाचा वापर केला जातो .”

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.