….तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वारंवार नुकसान होत असेल, तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला.

0

रयतसाक्षी: राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वारंवार नुकसान होत असेल, तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिला. त्या रविवारी (२६ डिसेंबर) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राज्यात विविध शासकीय परीक्षा रद्द होत आहेत. याकडे लक्ष वेधले असता डॉ. पवार यांनी राज्यात नेमके चालले काय? असा संतप्त सवाल केला. त्या म्हणाल्या, “परीक्षेला जात असताना, परीक्षा देत असताना पेपर फुटत असतात. परीक्षा देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही नेमके काय चालले हेच कळेनासे झाले आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्या, संस्थांकडे परीक्षेची जबाबदारी दिली जाते. तरीही राज्य शासन नेमके काय कारवाई करत आहे हेच कळत नाही.”

हे ही वाचा:सर्पराज्ञीतील सौंदर्यवती लाल हादग्याची निसर्गप्रेमींना भुरळ https://rayatsakshi.com/880/

हादग्याची निसर्गप्रेमींना भुरळ https://rayatsakshi.com/880

“याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात आवाज उठवत आहेत. याबाबत वारंवार चुका होत असतील तर केंद्रशासन यात लक्ष घालून कारवाई करेल,” असा इशाराही भारती पवार यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.