ओमायक्रॉन:मुलांना कोव्हॅक्सिनच; ज्येष्ठांसाठी दोन डोसमध्ये अंतर ९ ते १२ महिने, देशात नव्या व्हेरिएंटचे रुग्ण ५०० वर, मध्य प्रदेश-हिमाचलमध्येही संसर्ग

मुलांना रोज २३ लाख डोस दिल्यास १ महिन्यात पहिला डोस पूर्ण होईल

0

रयतसाक्षी: केंद्र सरकारने १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ३ जानेवारीपासून लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांसाठी देशात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ व झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ लस मंजूर झाली आहे. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुलांना फक्त कोव्हॅक्सिनच दिली जाईल. म्हणजे झायकोव्ह-डी लस सध्या दिली जाणार नाही. दरम्यान, आजारी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये ९ ते १२ महिन्यांचे अंतर राहू शकते.

सध्या मुलांची फक्त एक कॅटेगरी बनवली जाईल. त्यांची संख्या ८ ते १० कोटी असू शकते. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी दरमहिन्याला कोव्हॅक्सिनचे ५ कोटी डोस मिळतात. कंपनी दरमहा ७ कोटी डोस तयार करत आहे. सध्याच्या क्षमतेनुसार, मुलांना रोज १७ लाख डोस दिले जाऊ शकतात. कंपनीने उत्पादन क्षमता ७ कोटी केल्यास रोज २३ लाख डोस शक्य आहेत. एका अधिकाऱ्यानुसार, कोव्हॅक्सिनचे २ कोटी डोस स्टॉकमध्ये आहेत. सध्या प्रौढांना तिचे १० ते १५ लाख डोस रोज दिले जात आहेत.

१-२ जानेवारीपासूनमुलांची नोंदणी शक्य
मुलांच्या डोससाठी नोंदणी १ किंवा २ जानेवारीपासून कोविन अॅपवर सुरू होईल. त्यांना ३ जानेवारीपासून डोस दिले जातील. अशाच प्रकारे ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठांना १० जानेवारीपासून तिसरा डोस देणे सुरू होईल. त्यांची नोंदणी १० जानेवारीच्या २-३ दिवस आधी सुरू होईल.

झायकोव्ह-डीची लस मिळणार नाही
केंद्र सरकारने झायडस कॅडिलाला झायकोव्ह-डीची १ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे, पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती मिळण्याची शक्यता नाही. सूत्रांनुसार, ही लस सध्या मुलांना दिली जाणार नाही. एनटागीने तिला राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्टही केले नाही. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढून ५०२ झाले. रविवारी मध्य प्रदेशात ८, हिमाचलमध्ये १ रुग्ण आढळला.

…तर जानेवारीत तिसरा डोस घेऊ शकतील ज्येष्ठ नागरिक
कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर म्हणजे प्रिकॉशन डोसमध्ये ९ ते १२ महिन्यांचे अंतर राहू शकते. सूत्रांनुसार, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या (बूस्टर) डोसमधील अंतर ठरवण्यावर एनटागी विचार करत आहे. हेच अंतर राहिले तर मार्च २०२१ मध्ये दुसरा डोस घेणारे ज्येष्ठ नागरिक जानेवारीत बूस्टर डोस घेऊ शकतील. त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल. आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाईल. जे गंभीर आजारांनी पीडित आहेत अशा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून बूस्टर डोस दिला जाईल.

 


१९ राज्यांत पसरला ओमायक्रॉन, १० राज्यांतरात्री कर्फ्यू, ५ राज्यांमध्येच लसीबाबत निर्देश
– राज्य रात्री लस सार्वजनिक खुल्या जागेत बंद जागेत सिनेमा/िजम कर्फ्यू अनिवार्य पार्ट्या बंद लग्नावर बंदी लग्नावर बंदी ५०% क्षमता
– महाराष्ट्रात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना जमा होण्यावर बंदी. गुजरातमध्ये नाइट कर्फ्यू फक्त ८ जिल्ह्यांत. हरियाणात १ जानेवारीपासून दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश.पंजाबमध्ये लस प्रमाणपत्र दिल्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल. {बिहार, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगण, केरळ, आंध्रने निर्बंध लावले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.