गोपिचंद पडळकरांच्या‌ जयंत पाटलांवरील आरोपाला रोहीत पवारांचे जशास तसे उत्तर

फक्त वक्तव्य करण्यासाठीच नेमत आहे, त्यामध्ये पडळकर येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळतेच',

0
  • पुणे, रयतसाक्षी: आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर हल्ल्याची व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यातला आहे तो आताच पुढे आणून राजकीय भांडवलं होत असेल तर चुकीचे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली.

तसंच, ‘त्यांना फक्त वक्तव्य करण्यासाठीच नेमत आहे, त्यामध्ये पडळकर येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळतेच’, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
गोपीचंद पडळकर यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असं सांगत एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

नोव्हेंबर महिन्यातला हा व्हिडीओ आहे. तो 26 डिसेंबर रोजी व्हिडीओ समोर आणला आहे. असा हल्ला असेल तर त्याचा निषेधच आहे. पण लोकांचा रोष का होता? व्यक्तिगत चुकीचे वाटते. या घटनेचं राजकीय भांडवलं होत असेल आणि एवढ्या दिवसांनंतर व्हिडीओ समोर आणून असं करत असेल तर चुकीचे आहे.

कुठल्याही आमदाराला सुरक्षा मिळते त्यांनी घेतली नाही हा व्यक्तीगत निर्णय आहे, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिले.
तसंच. एकत्रित बसून ही परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा आहे. काही ईडीचे विषय किंवा पवार कुटुंबावर टीका असेल ते करत असतात, असंही रोहित पवार म्हणाले.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे, त्याआधी दाभोळकर प्रकरणाचा तपास सुद्धा सीबीआयकडे गेला आहे, पण त्याचं काय झालंय? राज्य सरकार खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

महापोर्टल घोटाळा भाजपच्याच काळात झालाय तो घोटाळा उघडकीस आहेच. आताही टीईटी घोटाळ्याचे सगळे धागेदोरे हे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच कदाचित फडणवीस हे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत असावेत, जेणेकरुन केंद्राचा चौकशीवर कंट्रोल यावर राहील, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
पडळकरांनी काय केला होता आरोप

७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर हल्ला झाला होता. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झालेला आहे. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता आणि आश्चर्याची बाब म्हणजे, या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला, असा आरोप पडळकरांनी केला होता.

‘या हल्ल्याच्या कटात जिल्हायाचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच सस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा चालूच ठेवील, असंही पडळकर म्हणाले .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.