औरंगाबाद: जिल्ह्यास अवकाळीचा तडाखा ; वादळी वा-यासह गारपीट , शेती पिकांचे नुकसान

जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, औरंगाबाद तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला.

0

औरंगाबाद, रयतसाक्षी: जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, औरंगाबाद तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. त्यासोबतच जालना जिल्ह्यातील बदनापूर,अंबड, भोकरदन या तालुक्यातील गारपीट अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झालेलं आहे.

 

रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके आडवी पडलीत. गारपिटीमुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. गंगापुर तालुक्यातील गोदावरीच्या पट्यात जोरदार गारपीट झाल्याने कांद्याच्या रोपांची नासाडी झाली.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गंगापुर तालुक्यातील कायगाव परिसरात आठवडी बाजाराच्या ठिकाणी अर्धातास जोरदार पाऊस झाला. पावसासोबत गारपीठ झाल्यामुळे शेतकरी आणि दुकानदाराचे नुकसान झाले.

 

जोराच्या गारा पडल्यामुळे शेतामध्ये असलेल्या गहू, हरभरा या पिकाचे नुकसान झालेलं आहे. आज सकाळपासूनच औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलकासा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.