लग्न मंडपाच्या दारात, आठवडी बाजारात लसीकरण करा- उपजिल्हाधिकारी शरद  झाडके

तालुक्यातील प्रत्येक गावात दि.१ ते १० जानेवारी यादरम्यान या पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

0

केज, रयतसाक्षी: शासनाने विविध प्रयत्न करूनही अजूनही बरेच लोक लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्याचे बाकी आहेत त्यावर उपाय म्हणून व लसीकरणाची गती वाढवण्यासाठी थेट लग्न मंडपाच्या दारातच वऱ्हाडी मंडळींना लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आठवडी बाजार मधेही लसीकरण करण्यात यावे अशा केज प्रशासनाला सूचना उपजिल्हाधिकारी माननीय शरद झाडके यांनी दिल्या. केज तालुक्यातील प्रत्येक गावात दि.१ ते १० जानेवारी यादरम्यान या पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

देशावर येणारे तिसरी लाट व ओमीक्रोन चे संकट पाहता केज तालुका प्रशासन व आरोग्य विभाग यांनी लसीकरण करण्याची बाब गंभीरपणे घेतली असून लग्नतिथी दिवशी व आठवडी बाजार दिवशी जास्त प्रमाणात कसे लसीकरण करता येईल यावर माननीय उपजिल्हाधिकारी शरद झाडगे यांच्या अध्यक्षतेखाली केज तहसीलमध्ये बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीस तालुक्याचे तहसीलदार माननीय दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे व तहसील मधील इतर कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते

एक ते दहा जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या लसीकरण मोहिमेला सर्व सुजान जनता, युवक व सर्व समाजातील घटक यांनी सहकार्य करावे व हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन तहसील प्रशासन व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.