कळमनुरी- आखाडा बाळापूर मार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात

चार प्रवाशांचा जागीच मत्यू सहा गंभीर, जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविले; एकून २४ जखमी

0

रयतसाक्षी: हिंगोली ते नांदेड मार्गावर पारडी मोड शिवारामध्ये ट्रक व खासगी बसचा भीषण अपघात झाल्याने तिघे जण जागीच ठार झाले असून या भिषण अपघातात चौविस प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

बुधवारी दि. २९ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींना उपचारासाठी कळमनुरी, आखाडा बाळापूर, नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथून एक खाजगी बस (क्र. एम एच 38 एफ 8485) प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरी कडून आखाडा बाळापुर कडे जाणाऱ्या कंटेनरची खाजगी बस सोबत समोरासमोर धडक झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की खासगी बसमध्ये केबिन मध्ये बसलेले काही प्रवासी चालकाच्या समोरील काच फुटून बाहेर फेकले गेले. या अपघातामध्ये तिघे जण ठार झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी अत्यवस्थ असल्याने मृत्यूची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिसासह, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे यांच्यासह कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी एकत्र आले.

पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चार रुग्णवाहिका द्वारे अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी व आखाडा बाळापुर, नांदेड येथील रुग्णालयात पाठविले आहे.

कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली सापडलेली दोन जणांचे मृतदेह जेसीबी द्वारे कंटेनर उचलून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामध्ये तिघे जण ठार झाल्याची माहिती कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस सहा उपनिरीक्षक रोयलावार यांनी दिली आहे.

घटनास्थळावरील दोन्ही वाहनांची परिस्थिती अपघाताची भीषणता दर्शवित आहे. दरम्यान, पंचफुलाबाई विठ्ठल गजभारे वय-७० रा. बाभळी ता. कळमनुरी, विठ्ठल तुकाराम कणणापुरे वय ६० रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड, त्रिवेणाबाई राणप्पा अजरमोडकर वय-४५ रा. अजरसोंडा ता. औंढा , राजपा दगडु अजरसोंडकर वय ४८ रा. अजरसोंडा ता. औंढा या चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

तर, गजानन हरीभाऊ व्यवहार वय ५१ रा. कळमनुरी, महमद अमीन वय-५३ रा हिंगोली, खैरात सत्तार वय-५५ रा. हिंगोली,
मो. रपिक मो. लतीफ वय-४५ रा हिंगोली, दिगांबर नारायण बहादुरे वय ६० रा. पिंपरी गुप्ता कळमनुरी, बाबुराव ज्ञानोजीराव मोरे रा. वारंगा फाटा ता. कळमनुरी ,सुनंदा मनोहर इंगोले वय ४७ रा. नेरली कुष्ठधाम, नांदेड, इकबालखॉन बशीरखान वय २९ र अलवर, राजस्थान, गौतम सखाराम डोंगर रा. डोंगरकडा ता. कळमनुरी, सरगमी अलाउदीन रा. अर्धापूर जि. नांदेड ११. स. असलम रा. अर्धापुर जि. नांदेड,सफीयाबेगम स. तसलीम वय ६० रा. अर्धापुर, मे. आरेफा शे बाबआमीया वय ६० रा. लताजीवा, खाजामीया से अब्दुल रब रा. लाख ता. ओढा, रामप्रसाद माणकराव गडदे वय २६ रा. तांदूळवाडी ता. सेनगांव, सुमित्रा रामप्रसाद गढ़ वय २२ तांदुळवाडी ता. सेनगाव, शरद दत्तराव शिंदे वय ३१ रा सेनगाव, कुंडलिक रामराव नागरे वय ४३ हिंगोली, शे. हबीब शे. महेबुब बागवान वय ५० हिंगोली, सुभाष पऔळ वय ४० हिंगोली,विठठल श्रावण गजभारे वय-१० रा. बाभळी ता. कळमनुरी,नंदा काळे वय ५० रा. न. प. हिंगोली, राजाणा दगडऊ आजरसोंडेकर वय ५० रा अजरसोडा,भाग्यश्री विठ्ठल गजभारे वय ३० रा. बाभळी ता. कळमनुरी एकून २४‌प्रवाशी जखमी झाले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.