आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नात अन् अधिवेशनात लावली होती हजेरी

0

रयतसाक्षी: भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात देखील उपस्थिती लावली होती. तर नुकतेच पार पडलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील विखे पाटलांनी हजेरी लावली होती. आज त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील विखे यांनी केले आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत सांगितले आहे की, आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे ट्विट विखे यांनी केले आहे.

अक्षय कर्डिले यांच्या लग्नात लावली होती उपस्थिती
आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असुन, त्यांनी बुधवारी भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्या लग्नात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नात मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील पाहायला मिळाले. कोरोना झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांच्या लग्नात हजेरी लावताना मास्क देखील लावले नव्हते. त्यामुळे अनेक जण लग्नात विखेंच्या संपर्कात आल्याची भीती आहे.

भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी लावली होती हजेरी
शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात भाजपच्या अनेक मातंबर नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, खासदार गिरीष महाजन, भाजप नेते राम शिंदे, हर्षवर्धन पाटील तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात कोरोना झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असल्याचे पाहायला मिळाले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.