गर्दी टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यायलाच हवा – आरोग्यमंत्री

मुख्यमंत्री आज किंवा उद्या घोषणा करतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषदेत माहिती

0

रयतसाक्षी: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांमध्ये कठोर निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. निर्बंधाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तो आज किंवा उद्यामध्येच घेतला जाईल, असे सांगितले.

लसीकरणाबाबत केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचे शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन करावे अशी चर्चा झाली. लसीकरणापासून वंचित असलेल्या लोकांचे लसीकरण तातडीने झाले पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एवढेच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारे वर्ष असावे, असे आरोग्यमंत्र्यांन सांगितले. गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचे पालन करा, असे देखील राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे.

राज्यात 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी राज्यात पाच हजारांहून अधिक रूग्णांची भर पडली आहे. मुंबईमध्ये आज 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.