दादा भडकले; पहाटेच्या शपथविधीचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ‘जेव्हा बोलायचे ,तेव्हा बोलेल’

पहाटेच्या शपथविधी बाबद मंत्रीअजित (दादा)पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र ते यावरुन ते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

0

रयतसाक्षी: 2019 मध्ये राज्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे तेव्हा सर्वांनी पाहिले. मात्र यापूर्वीचे काही दिवस मोठे राजकीय नाट्य राज्यात सुरु होते. याचाच एक भाग म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी. आता या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नुकतेच भाष्य केले होते. यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र ते यावरुन ते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवारांना नेहमीच टोले लगावले जात असतात. याविषयावरची चर्चा दोन वर्ष झाले तरीही संपलेली नाही. शरद पवारांनी नुकतेच या विषयावर भाष्य केले होते. यावरुन अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा ते भडकल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, ‘भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापनेविषयी मला बोलायचे नाही. मला जेव्हा बोलायचे आहे त्यावेळेस बोलेन. पक्षातील जेष्ठ व्यक्ती एकदा बोलल्यानंतर याविषया मी काही बोलणार नाही. असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

काय म्हणाले होते शरद पवार?
23 नोव्हेंबर 2019 रोजी अगदी भल्यापहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीवर अजुनही चर्चा होते. अजित पवारांना फडणवीसांसोबत शपथविधीला पाठवणारे शरद पवारच होते असे नेहमीच बोलले जाते. मात्र आता शरद पवारांनी यावर स्पष्टच उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असे म्हटले जाते. पण मी पाठवले असते, तर तिथे राज्यच बनवले असते. असं अर्धवट काही काम केले नसते. या चर्चांमध्ये काहीही अर्थ नाही. यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असा सूचक उल्लेख पवारांनी केला. मात्र या गोष्ट कोणत्या याविषयी ते बोलले नाहीत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.